४१३ अहवाल प्राप्त,३१ पॉझिटीव्ह, २७ डिस्चार्ज

 अकोला,दि.२० (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे  ४१३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३८२ अहवाल निगेटीव्ह तर ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. २७ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ११२३४(९०५६+२००१+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ७८०४९ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७६३२१ फेरतपासणीचे ३१०  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७७९४४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  ६८८८८  तर पॉझिटीव्ह अहवाल  ११२३४(९०५६+२००१+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

३१ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राम नगर येथील सात,  मलकापूर, रणपिसे नगर व केशव  नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, गोरक्षण रोड, गणेश नगर येथील प्रत्येकी दोन उर्वरित देवगाव ता. पातूर, उत्तम प्लॉट, बिसेन लेआऊट, रतनलाल प्लॉट, विरला, न्यू तापडीया नगर, केळीवेळी ता. अकोट, मोहम्मद अली चौक, कौलखेड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तर आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

२७ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक,  हॉटेल स्कायलार्क येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून १० अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

६०५ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ११२३४(९०५६+२००१+१७७) आहे. त्यातील ३२९ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १०३०० संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६०५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ