योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा




अकोला,दि.28 (जिमाका)- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ज्या योजनांची अंमलबजावणी विविध प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे करावयाची आहे, अशा योजनांच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथिल नियोजन भवनात आयोजित संयुक्त बैठकीत घेतला.

            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी  उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पवनकुमार खचोट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे तसेच सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. त्या अंतर्गत पंडीत दीनदयाळ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमणे नियमानुकूल करणे योजना, महाआवास ग्रामिण अभियान, पंतप्रधान आवास योजना-शहरी व ग्रामिण, आदिवासी पुनर्वसन गाव घरकुल वाटप योजना, माझी वसुंधरा अभियान, नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे मग्रारोहयो अंतर्गत गावांतील विकासकामांचे अभिसरण करण्याच्या मुद्दावरही चर्चा करण्यात आली. रोहयोच्या कामांबाबतही आढावा सादर करण्यात आला.

            यासर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे लाभार्थ्यांच्या अंतिम निवडसह प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ