543 अहवाल प्राप्त; 39 पॉझिटीव्ह, 37 डिस्चार्ज

 

अकोला,दि.9 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे  543 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 504 अहवाल निगेटीव्ह तर 39 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर 37 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल  याने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 10866(8746+1943+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 74120 जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 72436 फेरतपासणीचे 296 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1388 नमुने होते. आजपर्यंत एकूण 74051 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  65305  तर पॉझिटीव्ह अहवाल  10866(8746+1943+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 आज 39 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात  39  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 19 महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खेतान नगर येथील चार, गीता नगर येथील तीन, गोरक्षण रोड, लक्ष्मी नगर, लहरीया नगर, बलोदे लेआऊट व राम नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभूळगाव, काँग्रेस नगर, सांगवी खुर्द, तुकाराम हॉस्पिटल, बार्शीटाकळी, जठारपेठ, गायत्री नगर, शिवाजी नगर, पिंजर ता. बार्शीटाकळी, मचिंद्रा नगर, तोष्णीवाल लेआऊट, अकोट, विठ्ठल नगर, माधव नगर, तापडीया नगर, खडकी, हरिहर पेठ, हिंगणा फाटा, चौरे प्लॉट व शिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष असून ते अकोट व पुंदा ता. अकोट येथील रहिवासी आहे.

काल (दि. 8) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्याचाही समावेश आजच्या  पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

 37 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 10, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 22, अशा एकूण 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

   589 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10866(8746+1943+177) आहे. त्यातील 323 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9954 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 589 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना