रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः१०० चाचण्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

 अकोला,दि. २० (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १०० चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात बार्शीटाकळी  येथे दोन, तेल्हारा येथे पाच,  मुर्तिजापूर येथे नऊ, अकोला आयएमए येथे आठ, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या २० तर डॉ. हेडगेवार लॅब येथे तीन  चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोट येथे १७ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. जीएमसी येथे ३६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अशा एकूण १०० चाचण्यांमधून सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ३१ हजार १५१ चाचण्या झाल्या पैकी २०६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा