राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार 30 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा

 

        अकोला,दि.27 (जिमाका)- सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2003 -04 या शैक्षणिक सत्रापासुन इयत्ता 10 वी 12 वी च्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळणाऱ्या अनुसुचित जाती, विजाभज विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येतो.  माध्यमिक शाळा महाविद्यालयाच्या शिफारशीसह प्रस्ताव शनिवार (दि.30) पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत सर्वसाधारण विद्यार्थ्यामधुन प्रत्येक माध्यमिक विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 10 वी 12 वीच्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनुसुचित जाती, विजाभज विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास रुपये पाच हजार रोख पारितोषक, स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देण्यात येते. माध्यमिक शाळा महाविद्यालयामधुन इयत्ता 10 वी 12 वीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यामधुन प्रथम आलेल्या अनुसुचित जाती, विजाभज विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्याचे प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावा सोबत  विद्यार्थ्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रीकेची सांक्षाकिंत प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स विद्यार्थ्यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स प्रत जोडावे. मुदतीत प्रस्ताव प्राप्त झाल्यास विद्यार्थी योजनेपासुन वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारीही माध्यमिक शाळा महाविद्यालय प्रमुखाची राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ