बर्ड फ्ल्यू प्रसार व प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना तालुकानिहाय समिती गठीत

 


अकोला,दि.२६ (जिमाका)- जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्ल्यू आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होवू नये. याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तालुकानिहाय समिती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

उपविभागीय अधिकारी  यांनी समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, बर्ड फ्ल्यू संसर्गाचा प्रसार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण, बर्ड फ्ल्यू  संसर्गाचा प्रसार कमी करण्याकरीता बाधीत व सर्वेक्षण क्षेत्रामध्ये अधीसूचनेची अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे याबाबत कार्यवाही करावी. पशुधन विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांनी दैनदिन अहवाल सकंलीत करुन वरीष्ठ कार्यालयास सादर करणे, प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशव्दारे आणि परिसर दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किवा पोटॉशियम परमॅगनेटने निर्जंतुकिरण करुन घ्यावे, समितीच्या कामकाजाचे  दस्त व लेखे अहवाल ठेवणे, मोहिम सुरु होण्यापुर्वी जलद कृती दलातील सर्व सदस्यांचे आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार पीपीई किटचा पुरवठा करणे, मृत पक्ष्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबी सक्शन मशीन, फगर मशीन, स्प्रे मशीन व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणे.

तहसिलदार यांनी समितीच्या कामकाजावर समन्वय साधने आवश्यक साहीत्यांचा(प्लास्टीक ब्लीचींग पावडर, चूना पावडर इतादी पूरवठा करणे) मृत कुक्कूट पक्ष्यांचे तलाठी, ग्रामसेवक आणि पशुधन विकास अधिकारी यांचे  मार्फत स्थळ पंचनामा करुन घेणे. पोलीस निरीक्षक यांनी प्रभावित पोल्ट्री फार्मच्या  एक कि.मी. त्रिज्येतील परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, मृत पक्ष्यांचे विल्हेवाट लावतांना गर्दी होवू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे. तर पशुधन विकास अधिकारी(विस्तार) यांनी कार्यक्षेत्रात जनजागृती करणे, यासाठी आवश्यक ते आयईसीची निर्मीती करणे, या आजारासंदर्भात नागरिकांपर्यत माहिती पोहचविणे, प्रभावित क्षेत्राच्या 10 कि.मी.परिसरातील बाजारावर देखरेख ठेवणे. उपअभियंता पाठबंधारे जलसंपदा रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांनी स्थंलातरीत पक्षी, वन्य पक्षी, कावळे इत्यादी बर्ड फ्लुचा प्रसार होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधुन योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम पार पाडावे, असे आदेशाव्दारे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ