रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः४९ चाचण्यात तीन पॉझिटीव्ह

 अकोला,दि. २३ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ९ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे पाच, बार्शीटाकळी येथे एक, तेल्हारा येथे दोन,  वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहा चाचण्या झाल्या  त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोला आयएमए येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  ३१ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात  दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अशा एकूण ४९ चाचण्यांमधून तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ३१ हजार ३३४ चाचण्या झाल्या पैकी २०६६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ