लालबहादूर शास्त्री स्टेडीयम येथे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण


        अकोला,दि.25 (जिमाका) -    आज (दि.26) रोजी  ध्वजारोहणाचा  मुख्य  शासकीय समारंभ सकाळी  9.15 वाजता शास्त्री स्टेडीयमवर आयोजीत करण्यात येणार असुन  राष्ट्रध्वजारोहणाचा  कार्यक्रम राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या हस्ते होणार आहे.  या दिवशी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय व अर्धशासकीय समारंभ आयोजीत करण्यात येवू नये, जर एखाद्या कार्यालयास  अथवा  संस्थेला आपला  स्वत:चा ध्वजारोहणाचा समारंभ  करावयाचा असेल त्यांनी ते सकाळी  8.30  वाजताच्या  पुर्वी  किंवा  10 वाजेनंतर करावे.

कागदी, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज  वापरास बंदी

ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदी वा प्लास्टिकच्या राष्ट्र्ध्वजांच्या वापरावर बंदी  असून असे ध्वज  उत्पादन करणारे उत्पाद, विक्री करणारे विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.  अशा ध्वजांचा वापर थांबविण्यासाठी, नियंत्रण व जनजागृतीसाठी  जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच कार्यालये, प्रतिष्ठाने इ. ठिकाणी ध्वजारोहण करतांना भारतीय ध्वजसंहितेत दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. वापरण्यास उपयुक्त नसलेले. फाटके, जीर्ण, माती लागलेले रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.

            प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलीस दलाचे दोन, होमगार्डचे दोन व एनसीसी विद्यार्थ्यांचा एक असे एकुण  पाच  प्लॅटून  संचालनात सहभागी होणार आहे   तसेच अग्निशामक दलाचे वाहन व अँबुलन्स  चा समावेश राहणार आहे. आरोग्य व मनपाचा  चित्ररथाचा समावेश राहणार आहे. परंतू विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार नाही तसेच कोणत्याही  शाळांनी  विद्यार्थ्यांना आमंत्रीत करू नये अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमात कोविडच्या  पार्श्वभुमीवर मास्कचा वापर करुन सुरक्षीत शारिरीक अंतर ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनमार्फत करण्यात  आले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ