राष्ट्रीय मतदार दिन (दि.२५ जानेवारी) :सोमवारी (दि.२५) लोकशाही निष्ठा शपथ, नवमतदारांना ओळखपत्रे वाटप

 अकोला,दि. २ (जिमाका)- राष्ट्रीय मतदार दिन हा सोमवार दि.२५ जानेवारी रोजी असतो. यादिनानिमित्त सोमवार दि.२५ रोजी जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालये व अधिनस्त कार्यालये येथे  मतदारांना  शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाच्या मुख्यालयात  नियोजन भवन सभागृह येथे सोमवार दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची उपस्थित राहणार असून  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. यावेळी नव्याने नोंदणी झालेल्या  मतदारांना छायाचित्र मतदान ओळखपत्र  समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन  उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ