३०७ अहवाल प्राप्त, ३७ पॉझिटीव्ह, ३६डिस्चार्ज; एक मयत

 अकोला,दि.२१ (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे ३०७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २७० अहवाल निगेटीव्ह तर ३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. ३६ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, तर एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. 

त्याच प्रमाणे काल (दि.२०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ११२७९(९०९३+२००९+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ७८३५७ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७६६२६ फेरतपासणीचे ३१३  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७८२५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  ६९१५८  तर पॉझिटीव्ह अहवाल  ११२७९(९०९३+२००९+१७७)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

३७ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात ३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ज्योती नगर येथील चार, डाबकी रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, तुकाराम चौक, मोठी उमरी व  अकोट येथील प्रत्येकी दोन उर्वरित हिंगणा फाटा, सिंधी कॅम्प, वाशिम रोड, खानापूर, मलकापूर, आसेगाव बाजार, जठारपेठ, बाळापूर, आदर्श कॉलनी, राम नगर, मलकापूर रोड, जुने शहर, शिवणी व  कौलखेड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

आज सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर येथील तीन तर उर्वरित आदर्श कॉलनी, केशव नगर, एरंडा व कृषी नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

 

३६ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११,  हॉटेल स्कायलार्क येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून १० अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

एका महिलेचा मृत्यू

दरम्यान आज एका ६६ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला.  ही महिला लक्ष्मी नगर, खदान, अकोला येथील रहिवासी होती. त्यांना दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

६१३ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ११२७९(९०९३+२००९+१७७)आहे. त्यातील ३३० जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १०३३६ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६१३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ