480 अहवाल प्राप्त; 31 पॉझिटीव्ह, 25 डिस्चार्ज
अकोला,दि.7 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून
(सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 480 अहवाल प्राप्त झाले.
त्यातील 449 अहवाल निगेटीव्ह तर 31 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आले
असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल याने कळविले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट
मध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10766(8659+1930+177) झाली आहे,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 73147 जणांचे
अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 71398 फेरतपासणीचे
295 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1386 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 73079 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या 64420 तर पॉझिटीव्ह अहवाल 10766(8659+1930+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज 31 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 11 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शास्त्री नगर येथील पाच, मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, अकोट, व्हिएचबी कॉलनी व जीएमसी हॉस्टेल येथील
प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवणी, सिंधी
कॅम्प, जूने आरटीओ रोड, वाशिम बायपास,
हरीहर पेठ, गीता नगर, गोरक्षण
रोड, राधाकिसन प्लॉट, जिल्हा परिषद
कॉलनी, अदुरा ता. बाळापूर व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक
याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक
महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर, तेल्हारा
व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
काल
(दि. 6) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात सात
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्याचाही
समावेश आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
25 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना,आयकॉन
हॉस्पीटन येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून
दोन, तर बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, तसेच
होम आयसोलेशन येथून 10, अशा एकूण 25
जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
549 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा