३७६ अहवाल प्राप्त,३२ पॉझिटीव्ह, ३२ डिस्चार्ज, एक मयत

 अकोला,दि.१९ (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे  ३७६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३४४ अहवाल निगेटीव्ह तर ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. ३२ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, तर एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ११२०१(९०२५+१९९९+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ७७५८७ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७५८६५ फेरतपासणीचे ३१०  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७७५३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  ६८५०६  तर पॉझिटीव्ह अहवाल  ११२०१(९०२५+१९९९+१७७)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

३२ पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १७ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तीजापुर येथील चार, गणपती मंदिर,  रामनगर व संत नगर प्रत्येकी तीन, अमानका प्लॉट ,अकोट व जठार पेठ येथील प्रत्येकी दोन उर्वरित गोकुळ कॉलनी, सरस्वती नगर, रचना कॉलनी, डाबकी रोड, हिंगणा फाटा, वसंत टॉकीज, आदर्श कॉलनी, बंजारा नगर, राधाकिसन प्लॉट व शिवनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तर सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात  एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन  सिंधी कॅम्प तर एक खडकी येथील रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची  नोंद घ्यावी.

३२ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०,  आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून ११ अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. ही महिला डाबकी रोड, अकोला येथील रहिवासी होती, त्यांना दि.८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

५९९ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ११२०१(९०२५+१९९९+१७७) आहे. त्यातील ३२९ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १०२७३ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ५९९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ