जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रीक, स्ट्रक्चरल व फायर ऑडीट पूर्ण करा- जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

 


  अकोला,दि. ११(जिमाका)- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे  इलेक्ट्रीक, स्ट्रक्चरल व फायर ऑडीट लवकरात लवकर पूर्ण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना आज येथे दिले.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. सुरेश आसोले, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, विद्युत विभागाचे शाखा अभियंता राठोड, न.पा. प्रशासन अधिकारी  सुप्रिया तोलारे, मनपाचे अग्निशमन अधिकारी मनिष कतले तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले की,  प्रत्येक शासकीय आरोग्य संस्थेचे इलेक्ट्रील ऑडीट करण्यासाठी व स्ट्रक्चरल ऑडीट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत्या सोमवार  दि.१८ पर्यंत पूर्ण करुन अहवाल सादर करावे.  याच संस्थांचे फायर ऑडीट करण्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागाने अधिसुचित संस्थांकडून विहित प्रक्रियेचा अवलंब करुन  पुर्ण करावे,असे निर्देश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना