521 अहवाल प्राप्त; 43 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.10 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे  521 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 478 अहवाल निगेटीव्ह तर 43 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. 19 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले. तसेच आज खाजगी हॉस्पीटल येथून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल  याने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 10914(8789+1948+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 74681 जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 72996 फेरतपासणीचे 297 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1388 नमुने होते. आजपर्यंत एकूण 74572 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  65783  तर पॉझिटीव्ह अहवाल  10914(8789+1948+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 आज 43 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात  43  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 14 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प येथील तीन, डाबकी रोड, मलकापूर, जठारपेठ व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जांभा ता. मुर्तिजापूर, रचना कॉलनी, मरोदा ता. अकोट, पीकेव्ही, राधे नगर, न्यु तापडीया नगर, कृषि नगर, भिम नगर, जूने शहर, अकोट, छोटी उमरी, खडकी,  आर.के. प्लॉट, गीता नगर, गोरक्षण रोड, तांदाली बु. ता. पातूर, सहारा नगर, कैलास नगर, बिर्ला गेट, गौतम नगर, अशोक नगर, आदर्श कॉलनी, व्हिएचबी कॉलनी, दक्षता नगर, कौलखेड, पातूर, दिपक चौक, सिलोदा व रामदासपेठ येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून ते लाडेगाव ता. अकोट, जलतारे प्लॉट व देवरी ता. अकोट येथील रहिवासी आहे.

काल (दि. 9) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्याचाही समावेश आजच्या  पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

 19 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अकोला अक्सीडेंट येथून दोन, अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण चक्रधर कॉलनी, गुडधी रोड, अकोला येथील 47 वर्षीय महिलाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 6 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

   617 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10914(8789+1948+177) आहे. त्यातील 324 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9973 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 617 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना