प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ शास्त्री स्टेडीयम येथे

 अकोला,दि.२० (जिमाका)- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ  मंगळवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता लालबहादुर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे. या समारंभात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे.

कागदी, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज  वापरास बंदी

ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदी वा प्लास्टिकच्या राष्ट्र्ध्वजांच्या वापरावर बंदी  असून असे ध्वज  उत्पादन करणारे उत्पाद, विक्री करणारे विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.  अशा ध्वजांचा वापर थांबविण्यासाठी, नियंत्रण व जनजागृतीसाठी  जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत,असेही कळविण्यात आले आहे.

तसेच कार्यालये, प्रतिष्ठाने इ. ठिकाणी ध्वजारोहण करतांना भारतीय ध्वजसंहितेत दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. वापरण्यास उपयुक्त नसलेले. फाटके, जीर्ण, माती लागलेले रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ