बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदान

 


अकोला,दि.29 (जिमाका)- जिल्हा परिषद कृषि विभागामार्फेत शेतकऱ्यांना कपाशी बी.टी. बियाण्यावर 90 टक्के अनुदानावर सन 2021-21 खरीप हंगामात सर्वसाधारण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-2 बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदानावर कृषि विभागामार्फत योजना राबविल्या  जाणार आहे.  या योजनेकरीता 1 कोटी 18 लक्ष 43 हजार रुपयाची जिल्हा परिषद उपकरातुन तरतुद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये उर्वरित लाभार्थ्यांना लाभ  5 फेब्रुवारीपर्यंत  घ्यावा. उर्वरित लाभार्थ्यांनी प्रस्ताव आपल्या संबंधित पंचायत समितीस्तरावर सादर करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि व पशुसवंर्धन समितीचे सभापती पंजाबरावजी वडाळ व कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ