ग्रामपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद

             अकोला,दि.13 (जिमाका) - ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका 2020-2021 करिता शुक्रवार (दि.15)  रोजी मतदान होणार असुन सोमवार (दि.18)  रोजी मतमोजणी होणार आहे.

            जिल्ह्यातील ज्या गावातील निवडणूक क्षेत्रात मतदानाचे दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि.15) रोजी  व मतमोजणीचे दिवशी सोमवार (दि.18)रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा  दंडाधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी दिले आहेत.

            आणखी असेही आदेश पारीत करण्यात येत आहे की,  वर नमुद  ठिकाणांचे आठवडी बाजार दुस-या दिवशी भरविण्यात यावेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ