रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 110 चाचण्यात नऊ पॉझिटीव्ह

अकोला,दि. 27(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 110 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे पाच, बाळापूर येथे तीन, बार्शिटाकळी येथे एक, मुर्तिजापूर येथे 10, अकोला आयएमए येथे आठ, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 25 तर हेगडेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर तेल्हारा येथे 10 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 45 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला.  अशा एकूण 110 चाचण्यांमधून नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 552 चाचण्या झाल्या पैकी 2083 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ