वयोवृद्ध व्यक्तिंसाठी प्रशिक्षण

 अकोला,दि.२३ (जिमाका)- सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अकोला यांच्या कार्यालयामार्फत वयोवृद्ध व्यक्तिंचे आयुष्य आनंदी करता यावे यासाठी  प्रशिक्षण दिले जाणार आहे. सावली, सीएफएआर, हेल्प्ज इंडिया, फेसकॉम व एएससीओपी या संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तिंना भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्याची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची ओळख या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ३० व्यक्तींना देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक व्यक्तिंनी ९८६०९६४३२३ या क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण. अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ