390 अहवाल प्राप्त, 29 पॉझिटीव्ह, 41 डिस्चार्ज, दोन मयत

 


अकोला,दि.16(जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 390 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 361 अहवाल निगेटीव्ह तर 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर 41 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले. तसेच आज दोघांचे मृत्यू झाले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल  याने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11117(8952+1988+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 76855  जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 75153 फेरतपासणीचे 305 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1397 नमुने होते. आजपर्यंत एकूण 76793 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  67841 तर पॉझिटीव्ह अहवाल  11117(8952+1988+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 आज 29 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात   29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व पुर्वा काम्पलेक्स येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पिंजर ता. बार्शिटाकळी, अकोट, डाबकी रोड, जूने शहर, तरोडा कसबा ता. बालापूर, आदर्श कॉलनी,  बलवंत कॉलनी, शिवाजी नगर, जिल्हा परिषद कॉलनी, दिपक चौक, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, कौलखेड, रतनलाल प्लॉट, आनंद नगर, हिंगणा रोड, राजेश्वर मंदिर, नयागाव व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

 दरम्यान काल रात्री (दि.15) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

41 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन,  हॉटेल स्कायलार्क येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक,  बिहाडे हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 27 अशा एकूण 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दोन मृत्यू

दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात आरोग्य नगर, खदान, अकोला येथील 60 वर्षीय पुरुष असून तो दि. 1 जानेवारी रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर अकोट येथील 52 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 13 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

609 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11117(8952+1988+177) आहे. त्यातील 328 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10180 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 609  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ