504 अहवाल प्राप्त, 34 पॉझिटीव्ह, 18 डिस्चार्ज

 


अकोला,दि.15 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 504 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 470 अहवाल निगेटीव्ह तर 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर 18 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल  याने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11083(8923+1983+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 76532  जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 74837 फेरतपासणीचे 302 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1393 नमुने होते. आजपर्यंत एकूण 76403 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  67480  तर पॉझिटीव्ह अहवाल  11083(8923+1983+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 आज 34 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात   34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 21 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील पाच, तेल्हारा व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, जठारपेठ, लक्ष्मी नगर, भागवत प्लॉट, बोरगाव मंजू, गीता नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लहान उमरी, गड्डाम प्लॉट, गिरी नगर, राजेश्वर मंदिर, शास्त्री नगर, रामदास पेठ, न्यु तापडीया नगर, नामदेव नगर, झाडगा ता.बार्शीटाकली, खडकी व बार्शीटाकली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

 दरम्यान काल रात्री (दि.14) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

18 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन,  हॉटेल स्कायलार्क येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले पाच अशा एकूण 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

618 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11083(8923+1983+177) आहे. त्यातील 326 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10139 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 618  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ