रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 79 चाचण्या; आठ पॉझिटीव्ह
अकोला,दि. 7
(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 79 चाचण्या
झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
अकोट येथे तीन, बाळापूर येथे एक,
अकोला आयएमए येथे 11, आरोग्य कर्मचारी येथे 20 जणांचे
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 26 चाचण्या झाल्या
त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, तर हेगडेवार
लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार 50 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1988 पॉझिटीव्ह आले आहेत,
असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा