एक लाख चाचण्या; कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेची कामगिरी ‘लाख’मोलाची

 










अकोला,दि.२ (जिमाका)- अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापित व्हीआरडीएल प्रयोगशाळेने कोरोना विषाणू नमुन्यांच्या एक लाख चाचण्या पूर्ण केल्या. या एक लाख नमुन्यांच्या चाचण्यात १४९०० ( १४.९० टक्के)रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना विरुद्ध जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या लढाईत व्हीआरडीएल प्रयोगशाळेची ही कामगिरी ‘लाख’ मोलाची ठरली आहे.

कोरोना संकटाच्या काळात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजिवशास्त्र विभागाअंतर्गत COVID-19 च्या निदाना करीता VRDL प्रयोगशाळा १२ एप्रिल २०२० पासून सुरु करण्यात आली. या प्रयोगशाळेत RTPCTR व्दारे COVID-19 च्या संशयित रुग्णांच्या तपासण्या अव्याहतपणे सुरु आहेत.  गुरुवार दि.२१जानेवारी २०२१ रोजी या प्रयोगशाळेने एक लाख तपासण्या पूर्ण केल्या. तपासणी करण्यात आलेल्या एकुण एक लाख चांचण्यापैकी १४९०० ( १४.९० टक्के) रुग्ण हे CoviD-19 करीतापॉझिटिव्ह आढळले आहेत.

सुरुवातीला राज्यात ज्या सात प्रयोगशाळा विषाणुजन्य साथीच्या आजारांच्या निदाना करीता ICMRDHR तर्फे महाराष्ट्रात एकुण सात प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या त्या अकोला VRDL प्रयोगशाळेचा समावेश होता.

शेजारील जिल्ह्यांनाही झाली मदत

सुरवातीला अकोला जिल्ह्याव्यतिरिक्त अमरावती ,वाशीम, बुलडाणा, यवतमाळ  येथील तसेच जळगाव येथील रुग्णांचे नमुने सुद्धा या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. आतापर्यंत बाहेर जिल्ह्यातील तब्बल २४ हजारांपर्यंत नमुने तपासण्यात आले.

आता या इतर जिल्ह्यांमध्येही  C0VID-19 RTPCTR प्रयोगशाळा कार्यान्वीत झाल्यामुळे सध्या फक्त अकोला येथील प्रयोगशाळेत फक्त अकोला जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी होत आहे. याच प्रमाणे बुलडाणा व वाशीम येथील प्रयोगशाळा स्थापित करण्याकरीता तेथिल अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण या प्रयोगशाळेत देण्यात आले व प्रयोगशाळा उभारणी करीता आवश्यक मदतही येथील तंत्रज्ञांनी केली आहे.

तपासण्यात येणाऱ्या नमुन्यांत अकोला जिल्ह्यातील सर्व COVID-19 संशयीत रुग्ण, त्यांच्या संर्पकातील व्यक्ती तसेच सुपर स्प्रेडर व कमी जोखीम गटातील व्यक्ति तसेच शिक्षक ,पोलीस, सरकारी कर्मचारी,सफाई कामगार, भरती प्रक्रियेसाठीचे उमेदवार, विदेशगमन तसेच विमान अथवा आंतरराज्य प्रवासाकरीता तपासणी करु च्छिणाऱ्यांच्या तपासण्या करण्यात येतात.

चाचण्यांच्या क्षमतेत वाढ

सुरुवातीला या प्रयोगशाळेची क्षमता दररोज १०० चाचण्या करण्याची होती ती पुढे २५० पर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर ही क्षमता वाढविण्याच्या दृष्टिने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रयत्नातून Automoted RNA Extraction मशिन व अतिरीक्त RTPCTR मशिन उपलब्ध झाल्याने आता ही क्षमता दररोज ७५० नमुने तपासण्याची झालेली आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत या प्रयोगशाळेत दररोज १००० ते १२०० तपासण्या केल्या जाऊ शकतात.

भविष्यातही उपयुक्तता

या प्रयोगशाळेत नमुने तपासणी करीता लागणारे सहसाहित्य, रसायने इ. संचालक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांचे मार्फत हाफकिन संस्था ,मुंबई यांचे कडून उपलब्ध करुन देण्यात येतात.  भविष्यात या प्रयोगशाळेत  स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, चिकुन गुन्या, काविळ यासारख्या विषाणूजन्य आजारांचे निदान करता येईल.

निरंतर सेवा

सध्या या  प्रयोगशाळेत ICMR तर्फे दोन संशोधक, एक संशोधन सहाय्यक व दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरण्यात आली आहेत. डॉ. नितिन अंभोरे या प्रयोगशाळेचे प्रमुख तथा प्रिन्सीपल इव्हेस्टीगेटर असून डॉ. रुपाली मंत्री को. प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर म्हणुन काम पार पाडत आहेत. त्यांच्या मार्गदर्श्नात VRDL प्रयोगशाळेत कार्यरत प्रयोगशाळा तंत्रज्ञ व सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ तसेच डाटा एंट्री ऑपरेटर मागील दहा महीन्यापासुन निरंतर सेवा देत आहे.

अशी होते चाचणीची प्रक्रिया

संशयित रुग्णाच्या घशातील वा नाकातील स्त्राव घेऊन तो परीक्षानळीत साठवला जातो. तेथून तो प्रयोगशाळेत आणल्यानंतर त्याची नोंदणी व संदर्भासाठी आयसीएमआरकडे त्याचे ऑनलाईन विवरण भरले जाते.  त्यानंतर काही रसायने टाकून या नमुन्यात संभाव्यतः असलेला विषाणू निष्क्रीय केला जातो. त्यानंतर यंत्राद्वारे त्याचा सार वेगळा करुन त्यातून विषाणूचा आरएनए विलग केला जातो.  त्यानंतर पॉलिमरेज चेन रिॲक्शन द्वारे नमुना पॉझिटीव्ह आहे की नाही याचे निदान होते. एका वेळी या यंत्रात ९२ नमुने प्रक्रिया केले जाऊ शकतात. संपूर्ण प्रक्रिया व्हायला चार तासांचा कालावधी लागतो. शक्यतो त्या दिवसाचे नमुने त्याच दिवशी  तपासून दिले जातात, असे डॉ. अंभोरे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ