महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*
अकोला, १४ : आदिशक्ती अभियान गावोगाव उत्कृष्टपणे
राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले.
जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधीकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिला सक्षमीकरणासाठी आदीशक्ती अभियान राबविण्यात येत असून गावोगाव प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ग्रामपंचायतीना तालुका ते राज्यस्तरापर्यंत लाखो
रूपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी सांगितले.
विशेष अभियानांतर्गत जिल्हयात ग्रामस्तरीय समित्या गावोगाव स्थापन झाल्या आहेत. ७ तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले.
अभियानात गावोगाव ग्रामसेवक यांनी wcdadhishakti.in या पोर्टलवर ग्रामपंचायतीची नोंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या
घटकातील महिलांपर्यंत पोहचविणे, राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजीक, शैक्षणीक, आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे हा या अभियानाचा मुख्य उदेश आहे.
जिल्हयात या अभियानांतर्गत जनजागृती सुरू असून माहीती या अभियानांतर्गत दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत आदीशक्ती अभियानच्या शासन निर्णयामध्ये ठरवन दिल्यानुसार झालेल्या कामांचे मुल्यांकन करून ग्रामपंचायतील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराअंतर्गत
तालुकास्तरावर प्रथम बक्षीस १ लाख, द्वितीय ५० हजार व तृतीय २५ हजार असे आहे.
जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस ५ लाख व्दितीय ३ लाख तृतीय १ लाख आहे शिवाय राज्य स्तरावर
प्रथम बक्षीय १० लाख, व्दितीय बक्षीस ७ लाख व तृतीय ५ लाख आहे. असे श्रीमती राजश्री कौलखेडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी सांगितले.
ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणुन घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे महत्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे निवारण करणे सक्षम समाज निर्माण करणे. लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देवुन किशोरवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाहमुक्त समाज निर्माण करणे तसेच लैंगीक, शारीरीक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचारमुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रूढींचे निर्मुलन करणे, महिला नेतृत्वाला
सक्षम करून पंचायत राज पध्दतीमध्ये त्यांचा सहभाग वाढवीणे, महिला किशोरी यांना शिक्षण रोजगार, निर्णय व मालमत्ता हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगारांच्या संधीच्या माध्यमातुन आर्थिक उन्नत स्त्री संकल्पना राबवीणे हे आदिशक्ती
अभियानांचे उददीष्टे आहेत
आदीशक्ती अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगीरी करणा. या
ग्रामपंचायतींना बक्षीस देऊन गौरवीण्यात येणार आहे. या बैठकीला बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले, वैशाली सांगळे, भारती लांडे समाधान राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. करंदीकर, गटविकास अधिकारी अशोक बांगर, प्रेमा पटोकर, एस के इंगळे मिलिंद मोरे,उपशिक्षणाधिकारी जे एन प्रधान,सह. प्रशासन अधिकारी अर्चना काळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर क.प्रशासन अधिकारी विद्या गिरी तसेच समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा