प्रजासत्ताक दिन वर्धापन समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण


            अकोला,दि.22 (जिमाका)-  प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिन  सोहळा  रविवार दि. 26 रोजी सकाळी  सव्वा नऊ वाजता  होणार आहे. जिल्ह्यात मुख्य शासकीय समारंभ शहरातील लाल बहादुर  शास्त्री स्टेडियम येथे होणार असुन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु  यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सकाळी सव्वा  आठ वाजता होणार आहे. याच दिवशी सायं. सहा वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक  कार्यक्रम होणार आहे.  या कार्यक्रमांना  जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते , अधिकारी, कर्मचारी ,नागरीकांनी  उपस्थित  रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ