पालकमंत्री ना.कडु यांनी घेतला विविध विभागाचा आढावा


अकोला,दि.25 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र विकास, महिला बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला बालविकास, शालेय शिक्षण कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश  उर्फ बच्चू कडु यांनी  आज जिल्हाधिकारी यांच्या  दालनात विविध विभागाचा आढावा घेतला.
 यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त  संजय कापडणीस,  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर उपस्थित होते.
 मत्स्यविकास विभागाचा आढावा घेतांना पालकमंत्री  ना. कडु म्हणाले की, खारपाणपट्ट्यात शेततळ्याद्वारे मत्स्य व्यवसाय करण्यासाठी चालना द्यावी, शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून मत्स्य शेतीचा विकास करावा तसेच मत्स्य विभाग विभागांचे प्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव तयार करावे असे निर्देश ना. कडु यांनी संबंधीतांना  दिले.
प्रत्येक तालुक्यातील एक शाळा दत्तक घेणार असल्याचे सांगुन ना.कडु  पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून  सर्व शालेय विद्यार्थ्यांना  गणवेश वाटप , रोहयोतून शाळा बांधकाम , अपंग , आई- वडील नसलेल्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती , शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले वितरण दी योजना राबविण्याबाबत सुचना दिल्यात. शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेतात अंधाराचा त्रास होवू नये यासाठी रात्रीच्या वेळी प्रकाश  व्यवस्थेसाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे,अशा सुचना विद्युत विभागाला ना. कडु यांनी दिल्यात. विजेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी  तक्रार मुक्त फिडर संकल्पना राबविण्यात यावी अशा सुचना त्यांनी दिल्यात. अकोल्यात शहिद स्मारक , बांधकाम कामगारांसाठी  सुरक्षा उपाययोजना , खारपाणपट्टयात विविध योजनांचे  एकत्रीकरण , अवैध सावकार , सहकारी  पाणी वापर संस्था , नदीकाठच्या गावात पावसाळ्यात पाणी घुसून नुकसान होते. अशा गावांसाठी पुर नियंत्रण योजना नेरधामणा बॅरेजच्या पाण्याखाली जात असलेल्या रस्त्यांसाठी  पुल बांधणे , खारपाणपट्टयातील गावात  गोड पाणी उपलब्ध् करून देण्याबाबत उपाययोजना , मुख्यमंत्री सडक योजना , मनरेगातून पादंण रस्ते  आदि योजना राबविण्याबाबत संबंधीत विभागांना  सुचना दिल्यात.
 यावेळी  मत्स्य विकास विभाग ,  जिल्हा परिषद सेस फंड, लघु पाटबंधारे विभाग , जिल्हा निबंधक सहकारी संस्था,  सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री सडक योजना , महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी , वनविभाग, सामाजिक वनिकरण  आदि विभागाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ