प्रजासत्ताक दिन:मुख्य शासकीय सोहळा लालबहादुर शास्त्री स्टेडियम येथे


अकोला,दि.16 (जिमाका)-   प्रजासत्ताक दिनाचा  70 वा वर्धापन दिन रविवार दि. 26  रोजी होणार  असुन जिल्ह्याच्या मुख्य  शासकीय समारंभ    लालबहादुर शास्त्री स्टेडियम येथे होणार आहे.  
 या समारंभात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश  उर्फ बच्चू कडु यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.  यासंदर्भात प्रजासत्ताक दिन सोहळा  आयोजन पूर्वतयारीसाठी आज बैठक घेण्यात आली.  यावेळी अपर जिल्हाधिकारी  नरेंद्र लोणकर,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच पोलीस, महानगरपालिका, क्रीडा कार्यालय शालेय शिक्षण  विभाग तसेच अन्य सर्व  संबधित विभगाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुचना देण्यात आली की,  मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यालय लालबहादुर शास्त्री स्टेडियम येथे सकाळी सव्वा नऊ वाजता  होणार आहे.  शासकीय  अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व नागरीकांना  या कार्याक्रमाला उपस्थित रहाता यावे यासाठी अन्य शासकीय, निमशासकीय  कार्यालये,  शाळा, महाविद्यालये इ. नी  सकाळी साडेआठ ते  दहा वाजे  दरम्यान ध्वजारेाहण  कार्यक्रम व  अन्य कार्यक्रम   आयोजीत करूनये,  अशी सुचनाही  देण्यात आली.  तसेच या पार्श्वभुमिवर  प्लास्टीक राष्ट्रध्वज निर्मिती, विक्री व वापर करण्यास बंदी असल्याचे सांगुन संबंधितांवर  कारवाईचे  निर्देश देण्यात आले.
प्रजासत्ताक दिन सोहळा  आयोजनात  विविध विभागांना  देण्यात आलेल्या  जबाबदारी व  कामकाज वाटपाचे नियोजन  सांगण्यात आले.  दिलेल्या सुचनांचे  पालन करून  प्रजासत्ताक  दिन सोहळा   आयोजन  करावे, असे  निर्देश देण्यात आले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ