राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबत करावयाच्या उपाययोजना


       अकोला,दि.21 (जिमाका)-  अकोला जिल्हयातील विविध शासकीय निमशासकीय, अशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठाने, स्थानिक प्राधिकरणे, शैक्षणिक संस्था व नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगष्ट, व 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाच्या सांस्कृतिक व क्रिडा सामन्यांच्या वेळी विदृयार्थी व नागरीक यांचेकडुन कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येतो अशा या वापरावर ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार बंदी असुन यापुढे असा वापर करणारे नागरिक, विदृयार्थी, उत्पादक, विक्रेते, वितरक व मुद्रक यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
         कार्यालये प्रतिष्ठाने व प्राधिकरणेतसेच इतर संस्थांनी ध्वजरोहणाच्या वेळी ध्वज वापराबाबत भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. राष्ट्रीय ध्वज हा कापडी आयताकृती असावा तसेच लांबी रुंदीचे प्रमाण 03:02 असणे बंधनकारक आहे. तसेच वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले, जीर्ण व खराब झालेले किंवा माती लागलेले रस्त्यावर, मैदानात पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत.
        त्याअनुषंगाने अशा राष्ट्रध्वजांची विल्हेवाट लावण्याकरीता गोळा केलेले राष्ट्रध्वज तालुका पातळीवर तहसिलदार कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत. अशा राष्ट्रध्वजांची परस्पर विल्हेवाट लावणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान असुन तसे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मककारवाई करण्यात येईल.
         प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी वापर थांबविण्यासाठी, नियंत्रण व जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्था, महाविदयालये, प्रशिक्षण संस्था व सर्व यंत्रणामार्फत ही बाब विद्यार्थी व नागरिकांच्या निदर्शनास आणुन देण्याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात येत आहे.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ