शिक्षणाचा अधिकार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर



            अकोला,दि.२७(जिमाका)- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९  अन्वये दरवर्षी २५ टक्के  प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. शिक्षणाच्या अधिकारान्वये राज्यातील कायम अनुदानित, विना अनुदानित,  सर्व प्रकारच्या व सर्व माध्यमांच्या सर्व मंडळांच्या संलग्न शाळांमध्ये  २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. सन २०२०-२१  या शैक्षणिक सत्रात  राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अकोला यांनी दिली आहे.

वेळापत्रक याप्रमाणे-
आर.टी.ई २५ टक्के  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० च्या ऑटो फॉरवर्ड केलेल्या शाळांचे बीईओ यांनी व्हेरिफिकेशन करणे (दि.६ फेब्रुवारी पर्यंत- १५ दिवस)
पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे (दि.११ ते २९ फेब्रुवारी २०२०- १५ दिवस)
सोडत काढणे- (११ मार्च ते १२ मार्च- दोन दिवस)
सोडतीद्वारे  प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहीत मुदतीत  बीईओ कडे जाऊन  कागदपत्रांची पडताळणी करणे आणि शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे (दि.१६ मार्च ते ३ एप्रिल- १५ दिवस)
प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टप्पा- १- १३ एप्रिल ते १८ एप्रिल, टप्पा-२-२४ एप्रिल ते २९ एप्रिल,  टप्पा -३- ६ मे ते १२ मे, टप्पा-४- १८ मे ते २२ मे असे प्रत्येक टप्प्यात पाच दिवसांचा कालावधी.
या प्रक्रियेसाठी बालकांची लागणारी कागदपत्रे या प्रमाणे-
रहिवासी दाखला- वैध कागदपत्रे- आधार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बील, फोन बील, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी,  गॅस बुक, बॅंक पासबुक,  मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ. पैकी कोणतेही एक.
जात प्रमाण पत्र- तहसिलदार, उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
अपंगत्व प्रमाणपत्र (विद्यार्थी दिव्यांग असल्यास)- जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिलहा शासकीय रुग्णालयाचे ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र.
कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला- तहसिलदार, नायब तहसिलदार दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र,
जन्माचा दाखला- ग्रा.पं./न/प./ मनपा/ यांचा दाखला/ रुग्णालयातील रजिस्टर मधील नोंद,/ आई वडीलांनी  अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.
बालकाचे छायाचित्र- प्रवेश घेणाऱ्या बालकाचे अलिकडच्या काळातील रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ