बांधकाम कामगारांना सुरक्षा संच; अर्ज मागविले


            अकोला,दि.२८(जिमाका)-  जिल्ह्यातील सर्व  नोंदीत बांधकाम   कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या वतीने  सुरक्षा संच पुरविण्यात येतात. त्यासाठी जिल्ह्यामध्ये  रितसर     विहित मार्गाने नोंदीत झालेल्या पात्र बांधकाम कामगारांनी आपले अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त  यांचे कार्यालय, गौरक्षण रोड,  श्रद्धा हाईट्स, अकोला या कार्यालयात सोमवार  ते गुरूवार सकाळी  ११ ते दुपारी तीन यावेळात प्रत्यक्ष  उपस्थित राहुन आवश्यक कागदपत्रासह द्यावेत.जिल्ह्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना  सुरक्षा संच  व अत्यावश्यक संचाचे नोंदीनुसार संबंधीत कंत्राटदार  यांच्या मार्फत दिलेल्या (राम नगर, सिम्प्लेक्स मिल जवळ, शिवणी ,(गोयनका गोडाऊन) MIDC अकोला, येथे वाटप करण्यात येईल.  कंत्राटदार यांच्याकडे परस्पर सुरक्षा संच व  अत्यावश्यक संचाचे अर्ज जमा करु नये. बांधकाम कामगारांनी कोणत्याही प्रकारे त्रयस्थ व्यक्तीद्वारे, संघटनाद्वारे, शासकीय  कर्मचाऱ्यांद्वारे दिशाभूल किंवा फसवणूक होणार नाही.  याबाबत दक्षता  घ्यावी, असे निर्देशनास आल्यास त्वरीत  संबंधित व्यक्ती विरूद्ध लेखी स्वरूपात तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ