केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना:उत्पन्न वाढ योजनांच्या लाभासाठी 7 फेब्रू. पर्यंत अर्ज मागविले


अकोला,दि.23 (जिमाका)-   केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 2019-20  या  आर्थिक वर्षासाठी आदिवासी लाभार्थ्यांना आर्थिक उत्पन्न वाढीच्या  योजनांच्या लाभ देण्यासाठी पात्र इच्छुक लाभार्थ्यांकडुन शुक्रवार                   दि. 7 फेब्रूवारी पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रकल्प कार्यालय अकोलाच्या कार्यक्षेत्रातील अकोला, वाशिम बुलढाणा या जिल्ह्यातीलअनुसूचित  जमातीच्या पात्र इच्छुक  लाभार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेअतंर्गत उत्पन्न वाढीसाठी-
आदिवासी युवतींना पिठगिरणी मशीन  85%  अनुदानावर पुरवठा करणे, लाभार्थी संख्या 38,
85%  अनुदानावर कोंबडी शेड पुरवठा करणे,लाभार्थी संख्या 16.
इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी  प्रकल्प  कार्यालयातुन अर्ज प्राप्त करून, संपुर्ण भरून शुक्रवार  दि. 7 फेब्रूवारी पर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसुल भवन, न्यु राधाकिसन प्लॉट अग्रेसन भवन समोर, अकोला येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ