25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहाने साजरा करण्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे आवाहन


            अकोला,दि.18 (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस घोषित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.यानिमित्ताने कार्यक्रमांचे नियोजन करण्याकरिता गट शिक्षण अधिकारी आणि शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासमवेत बैठक जिल्हा परिषद सभागृह अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.
            राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्य  शनिवारी (दि. 25) अशोक वाटिका येथून रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली सकाळी नऊ वाजता निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली येणार आहे. विद्यार्थ्यांसह विविध कर्मचारी आणि दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी देखील मतदार जागृतीसाठी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.राष्ट्रीय मतदार जागृती दिन साजरा करण्याकरिता विविध शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा ,पथनाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आयोजनाबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.या सभेला अकोला जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी वैशाली ठक आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
                                                           00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ