ध्वनीक्षेपक वापरासाठी वर्षात विशिष्ट 15 दिवस परवानगी


अकोला,दि.18 (जिमाका)-  ध्‍वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम नुसार, वर्षातील 15 दिवसांसाठी ध्‍वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6.00 वाजल्‍या पासून रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्‍याबात जिल्‍हाधिकारी यांना प्राधिकृत करण्‍यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी प्रस्‍तावित केल्‍यानुसार ध्‍वनीक्षेपक वापरासाठी ध्‍वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6.00 वा. ते रात्री 12.00 वाजेपावेतो जिल्‍हयात ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनीवर्धक यंत्रांचा वापर करण्‍याची परवानगी जिल्हाधिकारी तथा  दंडाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. 
यात बुधवार 19 फेब्रूवारी शिवजयंती- 1 दिवस , मंगळवार 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती -1 दिवस ,   शुक्रवार 1 मे महाराष्‍ट्र दिन  - 1 दिवस , रविवार 23 ऑगस्ट , बुधवार 26 ऑगस्ट, गुरूवार 27 ऑगस्ट गौरी विर्सजन , मंगळवार 9 सप्टेंबर  असे गणपती उत्‍सवाचे -4 दिवस , शनिवार 24 ऑक्टोबर अष्टमी व रविवार 25 ऑक्टोबर नवमी असे नवरात्री उत्‍सव - 2 दिवस, शुक्रवार 30 ऑक्टोबर ईद-ए-मिलाद -  1 दिवस, शनिवार 14 नोव्हेंबर  दिवाळी -  1 दिवस, शुक्रवार 25 डिसेंबर ख्रिसमस -  1 दिवस  गुरूवार 31 डिसेंबर -  1 दिवस यांचा समावेश आहे.
            जिल्‍हयात  उपरोक्त दिवशी ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनीवर्धक वापरण्‍याकरिता ध्‍वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6.00 वा. ते रात्री 12.00 वाजेपर्यंत या आदेशाव्‍दारे परवानगी प्रदान करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ