शिक्षक पात्रता परिक्षा रविवारी (दि.19)


अकोला,दि.16 (जिमाका)-   महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत रविवार दि. 19 रोजी शिक्षण  पात्रता परिक्षा  घेण्यात येणार   आहे.
 या संदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद अकोला यांनी दिलेल्या  माहितीनुसार, रविवार    दि. 19 रोजी अकोला शहरात  12  परिक्षा  केंद्रावर  ही परिक्षा   घेण्यात येणार आहे.  दोन सत्रात होणा-या परिक्षेत पहिल्या पेपर सकाळी साडेदहा ते दुपारी एक  वा. पर्यंत  तर दुसरा पेपर  दुपारी  दोन ते  साडेचार  पर्यंत होईल . पहिल्या  पेपरसाठी जिल्ह्यातील 4681 तर दुस-या पेपरसाठी 3425  परिक्षार्थी प्रविष्ठ  झाले  आहेत.
 परिक्षा शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा  परिरक्षक यांच्या नियंत्रणात चार  झोनल ऑफिसर , 29 सहाय्यक परिक्षक, 29 केंद्र संचालक , 55 पर्यवेक्षक , 260 समवेक्षक तसेच अन्य कर्मचा-यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. सुरक्षा राखण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली असुन पोलीस बंदोबस्त  ही तैनात असेल तरी या परिक्षेसाठी प्रविष्ठ परिक्षार्थींनी वेळेवर उपस्थित राहुन परिक्षा द्यावी असे आवाहन   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष प्रसाद , जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. वैशाली ढग यांनी केले आहे.
                                         00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ