केंद्र शासनाच्या स्टँन्डअप इंडिया योजना धनगर समाजातील महिलांकरीता 15 टक्के मार्जीन मनीसाठी अर्ज आमंत्रीत


                अकोला,दि.30(जिमाका)- केंद्र शासनाच्या  स्टॅंन्डअप इंडिया योजनेअंतर्गत  महाराष्ट्र राज्यातील  धनगर समाजातील महिलांकरीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक महिला लाभार्थ्यांची   मर्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे  या नवउद्योजक  महिला लाभार्थ्यांना   एकुण प्रकल्प किमतीच्या   लाभार्थी यांच्या हिस्श्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मर्जीन मनी उपलब्ध करण्यात येणार आहे.
                या योजने अंतर्गत  महाराष्ट राज्यातील धनगर  समाजातील महिलांकारीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक  महिला  यांनी  10 टक्के स्वहीस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅंन्डअप इंडिया योजनेअंतर्गत  75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर  उर्वरीत  Front End Subsidy 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.  सदर योजनेचा लाभ स्टॅंन्डअप इंडिया योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येईल,  त्यासाठी संबंधीत महिला लाभार्थी यांनी  जिल्हाधिकारी यांच्या  अध्यक्षतेखालील  समितीकडे  केलेल्या विवरणपत्रात अर्ज सादर करणे  आवश्यक आहे,  अर्जासोबत उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र  व बँकेचे  कर्ज मंजुरीचे पत्र  जोडणे आवश्यक आहे.
                या योजनेस पात्र लाभार्थी  यांनी विहित नमुन्यातील  अर्ज  परिपूर्ण भरून वर  नमूद कागदपत्रासह सहायक आयुक्त समाज कल्याण अकोला  या  कार्यालयास पाठवावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ