‘धुळमुक्त अकोला’साठी समिती गठीत - जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश



      अकोला,दि.23 (जिमाका)-   अकोला शहरात ठिकठिकाणी सुरू असलेले  रस्त्यांची कामे अन्य कारणांमुळे वाढलेली धुळ आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी  उपाययोजनांची   अंमलबजावणी करून शहर  धुळमुक्त  करण्यासाठी संबंधीत विभागांची उपाययोजना समिती ठी करण्याचे   निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
            या संदर्भात आज जिल्हाधिकारी  कार्यालयात संबंधीत  विभागांची  बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे , राष्ट्रीय महामार्गाचे  कार्यकारी अभियंता    रावसाहेब  झाल्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय  अभियंता   दिनकर नागे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना उपअभियंता राजेंद्र धिनमिनेमनपा उपायुक्त  वैभव आवारे, मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, जान्दु कन्स्ट्रक्शनचे एम.एस. चंदनबटने आदी उपस्थित होते. यासंदर्भात पालकमंत्री ना. कडू यांनी दि.15 रोजी आढावा बैठकीत निर्देश दिले होते.
            यावेळी सुचना देण्यात आल्या की, जेथे रस्ते  वा अन्य विकासकामे सुरू आहेततेथे संबंधित ठेकेदाराने  धुळ नियंत्रणाबाबत उपाययोजना राबवण्यातया संदर्भात प्रत्यक्ष  साईट निहाय अहवाल जिल्हाधिकारी  कार्यालयास सादर करावा, असे  निर्देश देण्यात आले. जेथे रस्त्याचे मुरूम पसरवण्याचे काम सुरू असेल तेथे पाण्याचा शिडकावा करण्याबाबत तसेच  वळण  स्त्यांचे डांबरीकरण करावे म्हणजे धुळीचा उद्भव कमी होईलयाबाबत तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रारूप या प्रमाणे-
 अध्यक्ष-सहाय्यक आयुक्त मनपा अकोला, उपाध्यक्ष-  पोलीस उप निरीक्षक अकोला,  सदस्य सचिव- उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला,  सदस्य- निवासी नायब तहसिलदार, अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग,  कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,  कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग,  कार्यकारी अभियंता (बांधकाम) मनपा अकोला,  कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) मनपा अकोला,  कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला
            या समितीने धुळ प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्या धुळ नियंत्रण  करावे, असे  असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी दिले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ