राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज रॅलीचे आयोजन;सहभागाचे आवाहन


            अकोला,दि.२४(जिमाका)- जिल्ह्यात राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त (२५ जानेवारी) शनिवार दि.२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात शनिवार दि. २५ रोजी सकाळी नऊ वाजता अशोक वाटिका येथून रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येईल. या रॅलीमध्ये खेळाडू ,विद्यार्थी ,मतदार , कर्मचारी ,दिव्यांग बंधू-भगिनी यांचा समावेश असणार आहे. या रॅलीमध्ये पथनाट्य देखील सादर केले जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध शाळा महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थी -विद्यार्थिनी यांचा गौरव देखील या कार्यक्रमांमध्ये केला जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदार कार्डाचे वाटप करणे इत्यादी कार्यक्रम देखील घेतले जाणार आहेत.या कार्यक्रमाचे समन्वयक गजानन महल्ले असून उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले हे आयोजनाचे काम पाहत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ