शालेय विद्यार्थी वाहतुक; वाहनाची विशेष तपासणी मोहिम


अकोला,दि.17 (जिमाका)- जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या  सुरक्षितता  लक्षात घेवुन शालेय विद्यार्थ्याच्या  सुरक्षितता लक्षात घेवुन शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक  करणा-या सर्व प्रकारच्या वाहनामध्ये जि.पी.आर. एस. यंत्रणा बसविण्याबाबत तसेच  वाहनाचे सर्व  विधीग्राह्य कागदपत्रे व  12 पेक्षा  अधिक शालेय विद्यार्थ्यांची   वाहतुक करणा-या वाहनांमध्ये स्त्रि  सहवर्ती असणे  आवश्यक आहे. याबाबत जिल्हा स्कुल बस समिती  तथा पोलीस अधिक्षक यांनी  निर्देश दिले आहेत.
सर्व प्रकारच्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणा-या वाहनामध्ये पुर्तता करण्याकरीता  29 फेब्रूवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.   तरी देखील सदर  बाबीची पुर्तता न करणा-या वाहनांवर पोलीस विभाग, व परिवहन  विभागामार्फत दिलेल्या   मुदतीनंतर मोटार वाहन  कायद्यातंर्गत  कारवाई करण्यात येईल याची  अकोला जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्याची वाहतुक  करणा-या वाहन चालक/मालक यांनी  नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीच्या वतीने करण्यात  येत आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
                                                                00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ