सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम ‘महिला व सायबर सुरक्षा’ या विषयावर उद्या कार्यशाळा
अकोला,दि.1 (जिमाका) – सावित्रीबाई
फुले जयंतीनिमित्त शुक्रवार दि. 3 रोजी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने महिला व सायबर सुरक्षा या विषयावर कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय
अकोला येथे ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेच्या
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे राहणार असुन प्रमुख मार्गदर्शन श्रीमती मोहिनी मोडक या करणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी
संजय खडसे व जिल्हापत्रकार संघाचे अध्यक्ष
शौकतअली मिरसाहेब हे प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या
कार्यशाळेला सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील महिला अधिकारी/
कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने
यांनी केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा