पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.15)आढावा सभा


अकोला,दि.13 (जिमाका)-    राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,  भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 15 रोजी  दुपारी 2 वाजता   जिल्हा  वार्षिक योजना  तसेच इतर योजनांचा आढावा घेण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन श्री. छत्रपती सभागृहात सभा आयोजीत करण्यात आली आहे.  या सभेस विभागप्रमुखांनी तसेच सर्व कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुखांनी  उपस्थित राहावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे  सदस्य सचिव जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम