पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते आज (दि.२६)शिवभोजन केंद्राचा शुभारंभ


अकोला,दि.२५(जिमाका)- शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शिव भोजन योजनेचा रविवार दि.२६ रोजी  प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. अकोला येथे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  कृषि उत्पन्न  बाजार समिती या दोन ठिकाणी हे केंद्र रविवारपासून कार्यान्वित होतील. राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र विकास, महिला बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला बालविकास, शालेय शिक्षण कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश  उर्फ बच्चू डू यांच्या हस्ते या केंद्रांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेनुसार शिव भोजन थाळीत ३० ग्रॅमच्या दोन चपात्या,  १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १५० ग्रॅम एक मूद भात, १०० ग्रॅम एक वाटी वरण देण्यात येणार आहे. ही भोजन थाळी १० रुपयांमध्ये उपलब्ध होणार असून ही थाळी  दुपारी १२ ते दोन यावेळात उपलब्ध असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ