राष्ट्रीय ग्राहकदिन संपन्न ग्राहक संघटनांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील ग्राहकांना जागृत करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर









            अकोला दि.29 (जिमाका) –  कोणत्याही प्रकारची सेवा घेतांना ग्राहकांनी  जागृत असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील ग्राहकाची फसवणुक  जास्त प्रमाणात होत असते यासाठी विविध  ग्राहक संघटनांनी  पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील ग्राहकांना जागृत करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज  29 जानेवारी  रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
 यावेळी जिल्हा ग्राहक मंचाचे प्रभारी  अध्यक्ष सुभाष आळशी ,   निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे , जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे, अ.भा. ग्राहक पंचायत चे विदर्भ अध्यक्ष सुधाकर जकाते,  उपाध्यक्ष दादासाहेब वायचाळ, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदचे श्रीराम ठोसर , अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राजेंद्र पोतदार , अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदचे अध्यक्ष मनोहर गंगाखेडकर, नॅशनलीस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑरगेनायझेशनचे अध्यक्ष संजय पाठक , सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रतिक्षा तेजनकर , ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
             ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटीबध्द असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सेवा व उत्पादनाचा लाभ घेतांना  ग्राहकांनी दक्षता बाळगावी. ग्राहकांनी कोणतेही वस्तु खरेदी करतांना   वस्तुचे बिल मागावे असे सांगुन  जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  कोणतीही सेवा घेतांना काळजी  घेतली तर त्यानंतर होणारी फसवणुक टाळता येवू शकते असेही ते म्हणाले.
            श्री.आळशी  यांनी  ग्राहक संघटनांचे सदस्य तसेच पदाधिकारी हे ग्राहकांच्या हितासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांनी आपल्या हक्का करीता न घाबरता लेखी स्वरुपात तक्रार देण्याचे आवाहन केले.यावेळी प्रशासन व ग्राहक  संघटनांनी समन्वय साधुन प्रंसगी ग्राहक  मंच मध्ये प्रकरण दाखल करुन ग्राहक चळवळ राबवावी  असेही ते म्हणाले. ग्राहकांचे हित जोपासणे आवश्यक असल्याचे सांगुन  ग्राहकमंचाच्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली.
            मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून  कार्यक्रमाचे उद्याटन करण्यात आले.यावेळी  शाहीर खंडुजी शिरसाठ यांनी ग्राहक दिनानिमित्त  जनजागृतीसाठी गीत म्हटले. प्रास्तावीक जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी केले.
            यावेळी श्री. सदगुरू इंडेन गॅस कंपनी ,अकोला गॅस एजन्सी, शिवभोजन थाळी, भारत संचार निगम लिमीटेड, महावितरण, वैदयमापनशास्त्र , अन्न व औषध प्रशासन आदी विभागांनी जनजागृती साठी माहितीपर स्टॉल लावले.                                                                     
                                                               ----000-----




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम