मच्छीमारांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा


अकोला,दि.3 (जिमाका)-  शेतक-यांना देण्यात येणा-या किसान क्रेडिट कार्ड प्रमाणेच  मच्छीमार- मत्स्य व्यावसायिकांना ही किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ संकल्पात जाहीर  करण्यात आले असुन किसान क्रेडिट कार्ड बाबत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील मत्स्य कास्तकार , मत्स्य व्यावसायिकांनी या  सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अकोला व  सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अकोला यांनी केले आहे.
 किसान क्रेडीट कार्ड प्राप्त करण्यासाठी मच्छीमारांनी परस्पर बँकेत संपर्क साधावा व विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा. या अजा्रची एक प्रत पुढील पाठपुराव्यासाठी सहाय्यक आयुक्त  मत्स्य व्यवसाय अकोला त्यांच्या कार्यालयात सादर करावी , असे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अकोला यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ