शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविले


            अकोला,दि.२८(जिमाका)-  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजन कार्यान्वित आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतगत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा परस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक. राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१८-१९ या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी ५ फेब्रुवारी  पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
            या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येतात. संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. ५ फेब्रुवारी पर्यंत सादर करावे. तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर           करणाऱ्या अर्जदारांनी आपला अर्ज संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. ५ फेब्रुवारी पर्यंत सादर करावे. याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावली इ. माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय दिनांक २४ जानेवारी, २०२० चे अवलोकन करावे. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर - .... www.maharashtra.gov.in      www.mumbaidivsports.com  उपलब्ध आहे.
            जीवन गौरव पुरस्काराकरीता ज्येष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांचेकडून तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र! राज्य, पुणे, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अथवा संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पुरस्कारासाठी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ