जिल्हा आढावा बैठक सेवा हमी कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर




अकोला,दि.30(जिमाका)- सेवा हक्क अधिनीयम या कायद्यातंर्गत विविध शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येतो. या कायद्यामध्ये शासकीय कार्यालयातील विविध सेवांचा अंतर्भाव असतो यासाठी या कायद्यातंर्गत विहित अवधी दिलेला आहे. दिलेल्या अवधीत सेवांचा  लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा यासाठी सेवा हक्क अधिनीयम कायद्याचे काटेकोटपणे  व तंतोतंतपणे पालन व्हावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे , नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, अधिक्षक श्रीमती पागोरेसह  सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
            महाराष्ट्र  लोकसेवा हक्क अधिनीयम 2015 अंतर्गत शासकीय कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या सेवांचा फलक कार्यालयात  दर्शनी  भागात लावण्यात यावा असे सांगुन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, या फलकावर  शासकीय कार्यालयातील  सेवांचा तपशील , शुल्क , अर्जाचा नमुना, कालावधी  , पद निर्देशन अधिकारी , प्रथम अपीलीय  व द्वीतीय  अपीलीय अधिकारी नाव  व पदनाम आदिंचा उल्लेख असावा. जिल्हाधिकारी यांनी   विविध अधिकृत सेवांचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन  बाबत आढावा घेतला.  ज्या कार्यालयांने  सेवा ऑनलाईन केल्या नसतील त्यांनी  लवकरच सर्वसेवा  ऑनलाईन कराव्यात अशा सुचना  त्यांनी दिल्यात.
            विभागवार आढावा घेतांना या विभागाचे   राज्यस्तर , विभागीय स्तर  व जिल्हास्तरावर प्रकरणे  प्रलंबीत आहेत अशा प्रकरणाची यादी  निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे  दि. 31  जानेवारी  पुर्वी सादर करावी अशा सुचना  जिल्हाधिकारी  यांनी दिल्यात.मा. पालकमंत्री यांच्याकडे प्राप्त तक्रारीचा आढावा घेऊन  या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही  करण्याबाबत सुचना दिल्यात.
            यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                   00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ