महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत बुधवार (दि.15) पर्यंत


अकोला,दि.13 (जिमाका) -   सन 2019-20 या  शैक्षणिक वर्षातील अनुजाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवार्गातील विद्यार्थ्याचे पोष्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, योजनेचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर भरण्यासाठी शासनाने  बुधवार (दि.15) पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  या मुदतीत विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्ती शिक्षण फी परिक्षा फी योजनेचे अर्ज भरून घेणे आवश्यक आहे.  मुदतीत अर्ज न भरल्या गेल्यास विद्यार्थी  लाभापासुन वंचित राहु शकतो तेव्हा प्रणालीवर अर्ज भरण्याची जबाबदारी ही  विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांनी प्रणालीवर भरलेले अर्ज  महाविद्यालयास प्राप्त झाल्यानंतर   अर्ज पडताळणी करून जिल्हा लॉगईनला पाठविण्याची संपुर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची असुन यासाठी शासनाने बुधवार (दि.22 जानेवारी) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वरील मुदतीत अर्ज भरुन घेवुन जिल्हा  लॉगईनला फॉरवर्ड करण्याची कार्यवाही  जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पुर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर  यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ