महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना :शेतकऱ्यांनी आधार संलग्नतेसाठी बॅंकांशी संपर्क करा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


            अकोला,दि.२७(जिमाका)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार संलग्न करण्याची कारवाई सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ८४९ शेतकऱ्यांपैकी ८१ हजार ४०८ शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करण्यात आले आहे. तर उर्वरित ३१ हजार २७२ शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण प्रक्रिया सुरु आहे.  अद्याप ११६९  शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण बाकी आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण बाकी आहे त्यांनी तात्काळ बॅंकांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
            यासंदर्भात जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हा बॅंक समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया,  नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक शरद वाळके तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ८४९ शेतकऱ्यांपैकी ८१ हजार ४०८ शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करण्यात आले आहे. तर उर्वरित ३१ हजार २७२ शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण प्रक्रिया सुरु आहे.  अद्याप ११६९  शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण बाकी आहे. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सुचना केली की, ज्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याशी अद्याप  आधार संलग्नता नाही त्या शेतकऱ्यांची नावे स्थानिक बॅंका व तालुका निबंधक  यांनी  संयुक्तरित्या शेतकऱ्यांशी संपर्क करुन  आधार संलग्निकरण करुन घ्यावे.  काही ठिकाणी शोध घेऊनही शेतकरी आढळून येत नाही,  गाव सोडून गेले आहेत वा मयत झाले आहेत  अशा शेतकऱ्यांची यादी  निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे बॅंकांनी व तालुका उपनिबंधकांनी द्यावी, जेणे करुन यासंदर्भातील पुढील कार्यवाही करता येईल. असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांचे अद्याप बॅंक खाते आधार संलग्निकरण केले नसेल त्यांनी तात्काळ बॅंकांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ