कनिष्ठ लिपीक व अनुरेखक पदभरती परीक्षा सोमवारी (दि.13)


            अकोला,दि.10 (जिमाका)-    जिल्हा निवड समितीतर्फे सोमवार  दि. 13 रोजी सकाळी 11 ते दु. साडेबारा या वेळात  सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला  कनिष्ठ लिपीक व अनुरेखक  पदभरती परिक्षा  होणार आहे.
                   ही परिक्षा  एल.आर. टी.  कॉलेज ऑफ कॉमर्स, नेकलेस रोड,  रतनलाल प्लॉट अकोला भाग A,  एल.आर. टी. कॉलेज ऑफ कॉमर्स , नेकलेस रोड, रतनलाल प्लॉट, अकोला  भाग B. या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परिक्षा कालावधीत या दोन्ही उपकेंद्रावर कायदा सुव्यवस्था अबाधित  राखण्यासाठी संपुर्ण  परिक्षा केंद्र परिसर व  100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया  1973  चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या आदेशान्वये परिक्षा केंद्र परिसरात  अनाधिकृत व्यक्ती व वाहन प्रवेश करता येणार  नाही. 100 मीटर  परिसरात झेरॉक्स,  फॅक्स , पानपट्टी ,टायपिंग सेंटर , एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इ. माध्यमे परिक्षा संपेपर्यंत बंद राहतील,  परिक्षा केंद्रात इंटरनेट, मोबाईल  फोन इ. नेण्यास मनाई करण्यात आली आहे.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ