जि.प.,पं.स. निवडणुक मतदारांना ओळखीसाठी 17 पुरावे ग्राह्य


अकोला,दि.3 (जिमाका)- जिल्हा परिषद व  पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे  मतदान  मंगळवार दि. 7 रोजी होणार  आहे. राज्य निवडणूक आयोगाने आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदारांची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १७ कागदपत्रे सादर करण्यास परवानगी दिलेली असुन ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
1.पासपोर्ट,
2.वाहन चालविण्याचा परवाना,
3. आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र,
4. केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम /स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचा-यांना
फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे.
5. राष्ट्रीयकृत बैंका अथवा पोस्ट ऑफीस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
6.स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र.
7.राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिका-याने  अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/इतर मागासवर्ग/विमुक्त जाती/भटकया जमाती/विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादीना फोटासहित दिलेले प्रमाणपत्र
8. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यत सक्षम
प्राधिका-याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
9.मालमतेबाबतची कागदपत्रे तसेच नोदणी खत इत्यादी (फोटासहित)
10. राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यत फोटोसहित
देण्यात आलेला शस्त्रास्त्राचा परवाना
11 राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र
12. राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यत दिलेले निवृत्त
कर्मचा-याने फोटो असलेले पासबुक
13.राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले निवत्त
कर्मचा-यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांचे, फोटो असलेले प्रमाणपत्र
14. राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यत दिलेले वयस्कर
निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असेलेले प्रमाणपत्र
15.केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड
16. राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यत दिलेली  शिधापत्रिका  (कुटूंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल. तसेच जर शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तीचे नाव असल्यास त्याने स्वलच्या वास्तव्याचा अन्य पुरावा जसे वीज वापराचे देयक दुरध्वनी वापराचे देयक, प्रॉपर्टी कार्ड किंवा घरपट्टी भरल्याची पावती सोबत आणणे बंधनकारक राहील.)
१७. आधार ओळखपत्र
मतदारांनी मतदानाचे दिवशी भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त वरील पैकी कोणताही एक पुरावा मतदारांनी सादर करणे आवश्यक आहे असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.
                                        00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ