प्रजासत्ताक दिन सोहळा :बंधूभाव वृद्धिंगत करुन जोपासू देशप्रेम-पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू


           
            अकोला,दि.२६(जिमाका)- शासनाच्या विविध योजनांद्वारे शेतकरी, कष्टकरी, कामगार, जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन काम करीत आहे. त्यासाठी आपण सारे मिळून एकोप्याने काम करु, आपपासात बंधूभाव वृद्धिंगत करुन देशप्रेमाची भावना जागवू या,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार कल्याण विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या यांनी आज येथे केले. प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापन दिन सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापनदिन येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी ना.कडू यांच्या सुविद्य पत्नी डॉ.नयनाताई कडू, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,महापौर अर्चना मसने, विधानपरिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, प्रभारी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गुहाळकर जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, माजी आमदार तुकाराम बिडकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष  डॉ. कोरपे,सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, विविध विभागांचे विभागप्रमुख ,विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आगामी काळात  अनाथ मुले, विधवा तसेच अन्य निराधारांना मानधन देणे, विद्यार्थ्यांना दाखले वाटप अभियान राबविण्याचा  तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा मनोदय जाहीर केला. ते म्हणाले की, आपण दिवाळी, ईद इ. धार्मिक सण साजरे करतो , प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे आपले  राष्ट्रीय सण आहेत, हे सण आपण साऱ्यांनी मिळून साजरे केले पाहिजे. त्यात सर्व नागरिकांनी सहभागी  झाले पाहिजे त्यासाठी तिरंगा जिल्हा उपक्रम राबवू असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्र ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पालकमंत्री ना.कडू यांनी परेडची पाहणी केली.शानदार संचलन झाले व सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.
आपल्या भाषणात पालकमंत्री ना.कडू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित स्वातंत्र्य    सैनिक व त्यांच्या परिवार सदस्यांना भेटून हितगुज केले. यावेळी जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटूंबियांना सन्मानाने पाचारण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 पोलीस वाद्यवृंदाने वाजविलेल्या वाद्यधुन वर  पोलीस दल, गृहरक्षक दल, एन सी सी कॅडेट, आर एस पी ,स्काऊट, गाईड, सैनिकी विद्यालयांनी शानदार संचलन केले. यावेळी विविध चित्ररथांच्या माध्यमातून  जनजागृती संदेशही दर्शविण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
या समारंभात गौरविण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे याप्रमाणे-
ध्वजदिन निधी संकलन-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे.
 बेस्ट स्पिकर- सानिका जुमळे,
रोबोटिक्स स्पर्धेतील विजेते- स्नेहल संदीप गवई, आचल संतोष दाभाडे, गायत्री दिलीप तावरे,. प्रांजली  संदानशिव, अंकिता विनोद वजिरे, सानिका विजय काळे, पूजा महावीर फुरसुले, प्रणाली चंद्रमोहन इंगळे, समिक्षा ओंकार गायकवाड,  गौर ज्ञानेश्वर झामरे, अर्पिता रमेश लंगोटे,  ऋचिक्ला शिवाजी मुंडाले,  निकिता सुभाष वसतकार,  सायली नितीन वाकोडे.
दिव्यांग प्रेरणा पुरस्कार- प्रा. विशाल कोरडे, अकोला, सैय्यद मोईल अली, बार्शी टाकळी.
जिल्हा उद्योग पुरस्कार-  मनोज के होरा, प्रकाश आर. हेमनानी,  गीता  जांगीड.
जिल्हा क्रीडा पुरस्कार- क्रीडा मार्गदर्शक युवराज उर्फ पंकज गुलाबराव गावंडे.
जिल्हा युवा पुरस्कार-  सागर नामदेवराव राखोंडे, पातूर.
जिल्हा युवा पुरस्कार संस्था- नेहरु युवा बहुउद्देशीय मंडळ, शिलोडा.
उत्कृष्ट शारिरीक शिक्षक- बुडग गाडेकर, संज्योती मांगे (चंदन)
वन विभाग-  बाळ उर्फ जयदीप काळणे, अमोल सावंत, वैष्णवी  गोतमारे.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय- संजय बरडे( दिव्यांग मतदान टक्केवारी वाढविणे), मोहम्मद अजीज,  सुधीर कडू, श्रीकांत देशमुख, प्रकाश अवचार, तुळशीराम गुजकर, विशाल कोरडे, प्रसाद झाडे, सर्जेराव देशमुख- मुख्याध्यापक भौरद माध्यमिक विद्यालय.
नैसर्गिक आपत्ती निवारण-  सुनिल कल्ले तलाठी, हरिहर निमकंडे तलाठी. दीपक सदाफळे, पिंजर,  होमगार्ड पी.एस. दामोदर, रहिम शाह बिस्मिल्ला शाह.
            तसेच या प्रसंगी प्रभूनाथ दादूराम यादव, चिखलगाव, राधाबाई श्रीराम यादव, सत्यभामा सरोदे, शिलोडा, शकुंतला श्रीराम पातोंड शिपापूर, टीना सयाजीराव देशमुख पैलपाडा  या शेतकऱ्यांना उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत ट्रॅक्टर अनुदान वाटप करण्यात आले.
 या सोहळ्याचे सूत्रसंचलन  निलेश गाडगे व शालेय कवायतींचे संचलन राजकुमार तडस यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शानदार समारंभ
प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयातही  मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी वृंद, राजकीय सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ